मनोगत
नमस्कार
आज हनुमान जन्मोत्सव. आजच मी इथे माझं लिखाण सुरु करतेय. आजचा दिवस चांगला आहेच. पण म्हणून मी आजपासून ब्लॉग सुरु केलाय असं नाही. मला वाटतं लिखाण ही अशी गोष्ट आहे की, चांगला मुहूर्त, चांगला दिवस बघून ते सुरु करायला हवं असं काही नाही. जेव्हा आणि जे जे मनात येईल ते ते त्या क्षणाला उतरवायला पाहिजे. तोच चांगला मुहूर्त. तसं आज एका मैत्रिणीच्या पाठिंब्याने माझा इथला वावर सुरु करतेय. जे माझ्या मनात येईल ते लिहायचा प्रयत्न करणार आहे. मग त्यात कविता असतील, लेख, पत्र असं काहीही असू शकेल. बघूया कसं काय काय जमतंय.
सध्याच्या या कोरोनाच्या काळात आपली आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांचीही काळजी घेऊया. +ve होऊ नये म्हणून काळजी घेतच मनातून मात्र +ve राहूया. लवकरच हे ही दिवस जातील.
तर मंडळी, भेटत राहूया असेच.👍
सुपर्ब
उत्तर द्याहटवाअभिनंदन 💐
मनःपूर्वक धन्यवाद!😊
हटवानवीन अध्यायाला सुरुवात. अशीच लिहीत रहा आणि छान छान वाचायला देत रहा.
उत्तर द्याहटवायाचे श्रेय मनापासून तुलाच 😊
हटवा