कोणाचं काय तर कोणाचं काय
मला कधी कधी(म्हणजे बऱ्याचदा😛) हे फिल्मस्टार लोक्स घरात कसे वागत असतील, कसे रहात असतील बघावं याची जाम उत्सुकता वाटत असते. म्हणजे आपण जसं एखादी वस्तू अगदी शेवटपर्यंत उपयोगात आणतो, तसं यांच्या घरात ही होत असेल का?? म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर...
सनी देओल भोकं पडलेला बनियन घालत असेल का? घालत असेल तर त्याचं कोण लहान मुलबाळ असेल ते त्याच्या मांडीवर बसून त्या भोकात बोट घालून खेळत असेल का? सलमानचं एकवेळ ठीक आहे. बनियनवर शूटिंग करायचं असतं त्याला. अगदी असंच नाही...त्याच्याकडे ठेवणीतले बनियनचे सेट असू शकतील. शूटिंग असेल तेव्हा ते घालायचे आणि घरात...पण न वापरातले बनियन त्यांच्या घरातल्या बायका कट्टा पुसायला घेत असतील का?
रेखाच्या घरात बरणीतलं लोणचं संपत आलं की रेखा त्या बरणीत आमटी घालून बरणी खळबळून घेत असेल का? तशी आमटी घालून कालवलेला भात तिने खाल्ला असेल का?
ऐश्वर्या तिच्या साड्या धुवट होईपर्यंत वापरत असेल का? जर नसेल तर ती त्या साड्यांचं काय करत असेल? त्याचे काठ काढून छानशा गोधड्या शिवून घेत असेल की छोट्या छोट्या पर्स, पाऊच, बटवे बनवून घेत असेल? की आराध्या साठी भारी फॅशन डिझायनर कडून त्याचे फ्रॉक शिवून घेत असेल?
दीपिका तिच्या घरी येणाऱ्या दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून ठेवत असेल का? बिप्स च्या घरी जाताना वड्या घालून न्यायला बऱ्या उपयोगी होतील. डबा परत दिला नाही दिला भानगड नाही.. म्हणून त्या साठवून ठेवत असेल का?
फार डोकं खातात बै असे प्रश्न..
जस्मिन जोगळेकर
😀😀😀 खरचं काय आणि कसे राहत असतील न?
उत्तर द्याहटवाहो ना 😂
हटवा