नक्षत्रबाग
मंडळी, थोडं वेगळ्या विषयावर वाचायला आवडेल का?
नक्षत्र बाग
सध्या नक्षत्र गार्डन ही संकल्पना सगळीकडं जोम धरायला लागलेय. काय आहे ही संकल्पना? तर, आपल्या पूर्वजांनी २७ नक्षत्रांना वेगवेगळी २७ झाडं नेमली आहेत. म्हणजे प्रत्येक नक्षत्राचा एक आराध्यवृक्ष आहे. एखाद्या विशिष्ट नक्षत्राला विशिष्ट झाड का असेल? तर, जेव्हा ते नक्षत्र आकाशात असतं तेव्हाच पृथ्वीवर त्याचा आराध्यवृक्ष फुललेला किंवा फळलेला असतो आणि मुख्य म्हणजे तो वृक्ष औषधी गुणांनी युक्त असा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ते नक्षत्र ज्या काळात उगवतं साधारण तेव्हा होणाऱ्या आजारांवर ते झाड उपयोगी ठरतं. ज्योतिषशास्त्रानुसार पाहिलं तर एकाच नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना साधारण एकाच प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. तर त्या आजारांवर ते झाड औषध पुरवतं. उदाहरण द्यायचं झालं तर, भरणी नक्षत्राचा प्रवास नोव्हेंबर ते मे असा असतो. या नक्षत्रावर जन्मलेल्या लोकांना पित्तदोषाचा त्रास असतो. भरणीचा आराध्यवृक्ष आहे आवळा. आता पित्तदोषाला उपयुक्त ठरणारा आवळा याच काळात बहरलेला असतो.
तर अशाच प्रकारे २७ नक्षत्रांना २७ झाडं नेमली आहेत. पूर्वीच्या काळी ही झाडं सहज भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असत. पण आता..
नक्षत्र गार्डन हे एक फॅड झालंय असं लोकं म्हणतात. पण जर विचार केला तर ही संकल्पना किती महत्त्वाची आहे ते आपल्या लक्षात येईल. या २७ झाडातली बरीच झाडं आता दुर्मिळ होत आहेत. त्यामुळं त्यांचं संवर्धन जर या तऱ्हेने होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. आणि वृक्ष तोडीच्या घटनांमध्ये ही झाडं लावून, वाढवली तर जमिनीचा काही भाग तरी झाडांनी व्यापतोय हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे.
तर..या विषयावर मी एक कार्यक्रम बसवला होता. प्रत्येक नक्षत्राची आणि त्याच्या आराध्यवृक्षाची माहिती असं त्याचं स्वरुप होतं. अर्थात यातली सगळी माहिती पुस्तकं वाचून, कुठे कुठे ऐकून मिळवलेली अशीच आहे. मी ती एकत्र लिहून ठेवली. एकूण आठ भागात हे लिखाण आहे. एकेक भाग शेअर करत जाईन.
जस्मिन जोगळेकर
फोटो गुगलवरुन
Congratulations.. And eagerly waiting for your posts
उत्तर द्याहटवाथँक्यू हर्षल
हटवा