ती आणि मी....


तिला आवडतो….
समुद्र, त्याची गाज, त्याची अथांगता
आणि मला….
परतलाटेसारखे शांत डोळे असणारी ती.

तिला आवडतो….
पौर्णिमेचा चंद्र, त्याचे चांदणे, त्याची शीतलता
आणि मला….
चेहऱ्यावर लुकलुकत्या चांदण्यांसारखे भाव असलेली ती.

तिला आवडतो….
मोगरा, त्याचे टपोरेपण, त्याचा दरवळ
आणि मला….
सुगंधाने दरवळणाऱ्या कुरळ्या केसांची ती.

तिला आवडतो….
पाऊस, त्याची संततधार, टपटपणाऱ्या पागोळ्या
आणि मला….
कोरड्या अंगाची पण मनातून चिंब भिजलेली ती.

तिला आवडतो….
वारा, त्याचे मनमुराद वाहणे, त्याचे उनाडपण
आणि मला….
रोमरोमातून भरभरुन वारा पिऊन घेणारी ती.

तिला आवडते….
नदी, तिची निर्मलता, तिचे खळाळते रुप
आणि मला….
पाण्यात पाय सोडून माशांच्या स्पर्शाने मोहरुन जाणारी ती.

तिला आवडते….

आणि मला…. 


जस्मिन जोगळेकर
१८/१२/२०२३.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक