पारिजातक

पक्षी कुजनाने पहाट सूरमयी झाली..

रविकिरणांनी क्षितिज रेषा रंगली..

घंटा नादाने गाभाऱ्यातील समई भक्तिमय झाली..

दवबिंदूंनी वृंदावनातली तुळस न्हाली..

अन् नेमक्या त्याच क्षणी…..

तुझी केशरी पावलं अगदी अगदी अलवार

नुकत्याच जाग्या झालेल्या तांबूस मातीवर विसावली.


मनाला कायमच भुरळ घालत आलं आहे

रातराणीच्या संगतीनं तुझं फुलणं 

अन् पहिल्या प्रहरी हे असं अक्षत विसावणं..

पण त्या वाऱ्यानं तरी किती खट्याळ असावं..

तुझ्याशी दंगामस्ती करताना या नाजूक देहाला

काही इजा होईल हेच विसरून का जावं.. 

तू मात्र कधी वाऱ्यावर रुसला नाहीस..

आपल्या पुष्पगंधाचं सारं सारं धन

खुशाल त्याला लुटायला दिलंस..

गंधाचे वस्त्र मृद-कणांना ल्यायला दिलंस..

मला वाटतं, मातीत अनाहत विसावण्यासारखंच

तुझं मनही अनाहत आहे, हो ना? 


जस्मिन

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिस्त

मध्यरात्र

भाग एक