भूल
निळ्याभोर आकाशाचा स्वर्गमंडप…
उंच उंच वृक्षांचे नक्षीदार खांब…
रंगबिरंगी पक्ष्यांनी केलेला शंखनाद…
नि रानफुलांची नाजूक बरसात…
याचीच भूल पडली का त्याला?
वाऱ्याने धरलेला सुंदरसा ताल…
त्यावर डोंगररांगांची वेडीवाकडी चाल…
पानांनी केलेला नामाचा गजर…
नि फुलांवर चाललेला गुंजारव…
याचीच भूल पडली का त्याला?
कधी उन्हाचे लखलखते झुंबर…
कधी पावसाचा नगारा सुंदर…
गारव्याने भारलेला गाभारा…
नि रात्री चांदणचुऱ्याचा पसारा…
याचीच भूल पडली का त्याला?
दिखाऊ गर्दीच्या कोलाहलातून
ऐकली त्याने शांततेची हाक…
निसर्गाच्या कुशीत शिरुन
विसावलाय आता बाप…
जस्मिन जोगळेकर.
सुंदर
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद 🙂🙏
हटवा